esakal | काहीही हं... म्हणे गाडी खराब झाल्याने बी फॉर्म नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

काहीही हं... म्हणे गाडी खराब झाल्याने बी फॉर्म नाही!

काहीही हं... म्हणे गाडी खराब झाल्याने बी फॉर्म नाही!

sakal_logo
By
राजेश चरपे

नागपूर : गाडी खराब झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या (zilha parishad election) उमेदवारी अर्जासोबत माजी विरोधी पक्षनेते अनिल निधान (Anil Nidhan) यांना पक्षाचा बी फॉर्म जोडता आला नाही अशी सारवासारव भाजपच्यावतीने केली जात आहे. आज पत्रकार परिषद घेऊन भाजपने निधान हेच आमचे अधिकृत उमेदवार असल्याचे (Bjp support to anil nidhan) जाहीर केले. गुमथळा जिल्हा परिषद सर्कलमधून भाजपने एकाही उमेदवाराला बी फॉर्म दिला नाही. त्यामुळे येथे भाजपचे कमळ चिन्ह राहणार नाही.(BJP's-support-to-Anil-Nidhan-in-zilha-parishad-election)

शिस्तबद्ध पक्ष म्हणून भाजपची ओळख आहे. कुठलीही निवडणूक अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने भाजप लढते. जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक जाहीर होऊन सुमारे दहा दिवस झाले. जिल्ह्यातील इतर उमेदवारांपर्यंत बी फॉर्म पोहोचले. शहराला लागून असलेल्या गुमथळा गावात तो पोहोचू शकला नाही. गाडी खराब झाली तर लगेच पाच मिनिटांत दुसरी गाडी उपलब्ध होऊ शकली असती. भाजपच्या सर्वच नेत्यांकडे महागड्या आणि आलिशान गाड्या आहेत. त्यामुळे गाडी खराब झाली यावर कोणाचाच विश्वास नाही.

हेही वाचा: दीपालीच्या आत्महत्येला रेड्डी देखील जबाबदार; राज्य शासनाचे शपथपत्र

निधान यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे भाजपचे सर्व नियोजन फिस्कटले. त्यांनी कोणालाच बी फॉर्म दिला नाही. त्यामुळे भाजपवर समर्थन देण्याची वेळ ओढवली. कामठी विधानसभा मतदारसंघात गुमथळा सर्कलचा समावेश आहे. तब्बल पंधरा वर्षे येथून माजी मंत्री बावनकुळे निवडूण आले होते. त्यांच्याच पुण्याईवर टेकचंद सावरकर हेसुद्धा विधानसभेत दाखल झाले.

बाबनकुळे यांना विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर कामठी तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळाची स्थिती आहे. निधान याचाच बळी ठरल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गुमथळा जिल्हा परिषद सर्कलमधून भाजपने एकाही उमेदवाराला बी फॉर्म दिला नाही. त्यामुळे येथे भाजपचे कमळ चिन्ह राहणार नाही.

हेही वाचा: उपराजधानीत डेंगीचा उद्रेक; सात दिवसांत आढळले १४४ रुग्ण

मी बंडखोर नाही

मी बंडखोरी केली नाही. तांत्रिक कारणामुळे बी फॉर्म जोडता आला नाही. मी भाजप समर्थित उमेदवार असल्याचे अनिल निधान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी आमदार टेकचंद सावरकर, किशोर बेले, योगेश डाफ, किरण राऊत, कैलास महल्ले आदी उपस्थित होते.

(BJP's-support-to-Anil-Nidhan-in-zilha-parishad-election)

loading image