esakal | उपराजधानीत डेंगीचा उद्रेक; सात दिवसांत आढळले १४४ रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

उपराजधानीत डेंगीचा उद्रेक; सात दिवसांत आढळले १४४ रुग्ण

उपराजधानीत डेंगीचा उद्रेक; सात दिवसांत आढळले १४४ रुग्ण

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्याला आता १८ महिने होत आले आहेत. कोरोनानंतर बुरशीच्या आजाराचा विळखा पडला. कोरोना, बुरशीच्या प्रादुर्भावाने आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाली. त्यात उपराजधानीसह नागपूर विभागात डासांचा उच्छाद (Mosquito infestation) वाढला आहे. कोरोना, बुरशीपाठोपाठ आता डेंगीचा (dengue) उद्रेक झाला आहे. नागपूर जिल्ह्यात अवघ्या सात दिवसांत १८९ डेंगीचे रुग्ण आढळून आले. यापैकी उपराजधानीच्या शहरात १४४ डेंगीग्रस्त आढळून आल्यानंतरही महापालिकेचा आरोग्य विभाग ढिम्म (Health Department slow) आहे. (189-dengue-patients-found-in-seven-days-in-Nagpur-district)

कोरोना, बुरशी आणि डेंगी अशा तिहेरी आजारांच्या संकटाचा सामना जनता करीत आहे. स्वच्छतेचा पुरस्कार मिळवणाऱ्या नागपूर शहराला डेंगीचा फास अधिक आवळला जात असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. मागील सात दिवसांत पूर्व विदर्भात आढळलेल्या २१३ डेंगीग्रस्तांपैकी १८९ डेंगीग्रस्त हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. त्यातही १४४ डेंगीचे रुग्ण नागपूर महापालिकेच्या हद्दीतील आहेत. यामुळे शहरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

हेही वाचा: १२ वर्षांचं प्रेम संपलं, प्रियकराने लग्न करताच प्रेयसीची आत्महत्या

मात्र, महापालिकेचा आरोग्य विभाग अद्यापही कोरोनाच्या विळख्यातून बाहेर निघालेला नाही. प्रशासन कोरोना नियंत्रणासाठी ठोस पावले उचलत असताना डेंगीवरील नियंत्रणासाठी ना जनजागरण मोहीम सुरू केली ना फवारणी सुरू केली. यामुळे डेंगीचा उद्रेक अधिक वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यात शहरातील दाट लोकवस्तीच्या झोपडपट्टी परिसरात तसेच उच्चभ्रूच्या वस्त्यांमध्येही डेंगीच्या डास अळ्यांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात आढळून येते.

कोणतीही कीटकनाशक फवारणीही होत नसल्याची खंत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत २०१८ डेंगीच्या आजाराने ११ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०१९ मध्येही ११ रुग्णांचा मृत्यू झाला. २०२० मध्ये तीन रुग्णांचा मृत्यू झाला. यावर्षी अद्याप मृत्यूंची नोंद आरोग्य विभागात नसल्याचे यादीतून दिसून आले.

हेही वाचा: पेरणीसाठी गेलेली आई परतलीच नाही, शेवटी मृतदेह लागला हाती

नागपूर शहरातील डेंगी

  • २०१८ मध्ये शहरात ५६५ डेंगीग्रस्त

  • २०१९ मध्ये ६३६ डेंगीग्रस्त

  • २०२० मध्ये १०७ डेंगीग्रस्त

पूर्व विदर्भातील डेंगी

  • २०१८ - १,१९९

  • २०१९ - १,३१६

  • २०२० - ९०२

डेंगीची लक्षणे

  • डोकेदुखी

  • ताप येणे

  • उकाडा वाढणे

  • अतिशय घाम येणे

हेही वाचा: बापरे! कर्जासाठी बॅंक व्यवस्थापकाकडून शरीरसुखाची मागणी

पावसाळा सुरू झाल्यानंतरही कुलरच्या टाकी स्वच्छ करण्यात आल्या नाहीत. त्यात शहरात पाण्याची टाकी, घरातील कुलरच्या टाकी, साठवलेले पाणी, वापर नसलेल्या विहिरी, खड्यात साचलेले पाणी यातून डासांचे प्रजनन मोठ्या प्रमाणात होते. परिणामी डेंगी व इतर संसर्गरोगाचा धोका उद्भवतो. या बाबी आरोग्याच्या दृष्टीने नियंत्रित करण्यास आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळणे आवश्‍यक आहे.
- डॉ. प्रवीण शिंगारे, सहयोगी प्राध्यापक, नागपूर

(189-dengue-patients-found-in-seven-days-in-Nagpur-district)

loading image