

नागपूर : अकोला, अमरावती, चंद्रपूर आणि नागपूर महानगरपालिकांमध्ये भारतीय जनता पार्टी–शिवसेना (शिंदे) महायुतीबाबत चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे. लवकरच उमेदवारांच्या याद्या जाहीर होतील, असा विश्वास माध्यमांशी बोलताना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.