Bomb : नागपूर रेल्वे स्थानकावर आढळली स्फोटके; उंदरांमुळे प्रकार उघडकीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bomb was found at Nagpur railway station

नागपूर रेल्वे स्थानकावर आढळली स्फोटके; उंदरांमुळे प्रकार उघडकीस

नागपूर : उंदराच्या कारनाम्यामुळे मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर (railway station) सोमवारी (ता. ९) वर्दळीच्या वेळेस एका बॅगमध्ये स्फोटके (Bomb) आढळून आली. त्यामुळे रेल्वे स्थानकावर खळबळ उडाली होती. रेल्वे आणि शहर पोलिसांनी तातडीने ती स्फोटके ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. तसेच देशाच्या मध्यवर्ती ठिकाणावर असलेले नागपूर रेल्वे स्थानक रडारवर आहे का? अशी शंका या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. (Bomb was found at Nagpur railway station)

नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर (railway station) सायंकाळच्या सुमारास प्रवाशांची मोठी गर्दी असते. बाहेरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या सुद्धा मोठ्या प्रमाणात असते. अशातच सायंकाळच्या सुमारास रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक पोलिसांच्या बूथजवळ एक बेवारस बॅग आढळली. बॅगच्या जवळच उदरांचा धुडगूस सुरू होता. तो धुडगूस थांबविण्यासाठी पोलिस बूथमधून बाहेर आले.

हेही वाचा: Nagpur : एक, दोन नव्हे तर तब्बल ४० सिलिंडरचा स्फोट; टिनाचे पत्रे वितळले

तेव्हा त्यांना मोठ्या प्रमाणात बेवारस बॅगच्या बाजूला उंदीर दिसले. त्यानंतर वाहतूक पोलिसांनी बॅग संदर्भात चौकशी केली. मात्र, त्यासंदर्भात कोणीही पुढे आले नाही. त्यामुळे पोलिसांनी तातडीने बॅगची तपासणी केली. तेव्हा पोलिसांना धक्का बसला. बॅगमध्ये २७ जिलेटिनच्या कांड्या (Bomb) आढळून आल्या.

रेल्वेस्थानकावर बॉम्ब (Bomb) सापडल्यानंतर तो निकामी करण्याची कारवाई सुरू करण्यात आली. तपासणीअंती त्यात जिलेटिनच्या काड्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा अनर्थ टाळण्यास उंदीराचा धुडगूस आणि वाहतूक पोलिसांची सतर्कता मोलाची ठरली. रविवारीच नागपुरात राष्ट्रपती रामनाथ कोविंद कार्यक्रमासाठी येऊन गेले. तर सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे काटोल दौऱ्यासाठी आले होते. मागील काही दिवसांपासून महत्त्वाच्या नेत्यांचे दौरे वाढले आहेत. अशात बॉम्ब सापडल्याने पोलिस व प्रशासनाची चिंता वाढली आहे.

हेही वाचा: 'शोरमा खाणे टाळा; ते भारतीय पाककृतीचा भाग नाही'

बॉम्ब पथक घटनास्थळी

घटनेची गंभीरता लक्षात घेता याबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले. तसेच शहर पोलिसांच्या बॉम्ब (Bomb) शोधक व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. काही क्षणातच रेल्वेचे व शहर पोलिसांचे बॉम्ब पथक घटनास्थळी पोहोचले. रेल्वे स्थानकाचे (railway station) मुख्य प्रवेशद्वार व इतरही द्वार बंद करण्यात आले होते. काही रेल्वेही थांबविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या कांड्या कुठून आल्या?

बॉम्ब पथकाने तातडीने जिलेटिनच्या कांड्या ताब्यात घेऊन निकामी करण्यासाठी नेले. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कांड्या कुठून आल्या? काही घातपात घडविण्याचा कट होता का? याबाबतही पोलिस गांभीर्याने तपास करीत आहे. पोलिस व रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

Web Title: Bomb Was Found At Nagpur Railway Station Excitement In The City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nagpurrailway stationbomb
go to top