
नागपूर : भारतीय दंड संहितेच्या कलम ४९८ अ अंतर्गत पतीच्या मित्राला ‘नातेवाईक’ मानता येणार नाही. हे कलम पती किंवा त्याच्या नातेवाइकांकडून पत्नीवर केलेल्या क्रौर्याचा गुन्हा ठरवते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदविले. तसेच पत्नीविरुद्ध हुंड्यासाठी छळास मित्राला प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीवरील गुन्हा रद्द केला.