

High Court Says Adult Woman Can Choose Her Husband and Live by Her Own Will Constitutional Rights Upheld
sakal
नागपूर : एखादी युवती सज्ञान झाल्यानंतर तिला स्वतःच्या आवडीचा जोडीदार निवडण्याचा आणि त्याच्यासोबत राहण्याचा घटनात्मक अधिकार आहे. बंदी प्रत्यक्षीकरण (हेबियस कॉर्पस) याचिकेतील सुनावणीदरम्यान संबंधित महिला स्वतःच्या इच्छेने एखाद्या व्यक्तीसोबत राहण्याची स्पष्ट भूमिका घेत असेल, तर तिच्या इच्छेलाच सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागते, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोंदवले.