esakal | ब्रेकिंग: नंदा खरे यांनी नाकारला साहित्य अकादमीचा पुरस्कार
sakal

बोलून बातमी शोधा

नंदा खरे यांनी हा पुरस्कार नाकारल्याची माहिती मिळतेय. नंदा खरे यांनी स्वतः ई सकळशी बोलताना ही माहिती दिली आहे. नंदा खरे यांनी हा पुरस्कार नाकारल्याची माहिती मिळतेय. नंदा खरे यांनी स्वतः ई सकळशी बोलताना ही माहिती दिली आहे. 

नंदा खरे यांनी हा पुरस्कार नाकारल्याची माहिती मिळतेय. नंदा खरे यांनी स्वतः ई सकळशी बोलताना ही माहिती दिली आहे. 

ब्रेकिंग: नंदा खरे यांनी नाकारला साहित्य अकादमीचा पुरस्कार

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर: सन 2020 साठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाले आहेत. यात प्रसिद्ध साहित्यिक नंदा खरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला. याबद्दलची घोषणा आज करण्यात आली. मात्र नंदा खरे यांनी हा पुरस्कार नाकारल्याची माहिती मिळतेय. नंदा खरे यांनी स्वतः ई सकळशी बोलताना ही माहिती दिली आहे. 

साहित्य अकादमीने आज 20 भाषांमध्ये वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. यात सात कविता संग्रह, चार कादंबरी, पाच कथा संग्रह, दोन नाटक आणि प्रत्येकी एका स्मरणिकेचा आणि महाकाव्याचा समावेश आहे. यामध्ये नागपूरच्या नंदा खरे यांच्या 'उद्या' या कादंबरीला मराठीचा सन 2020 साठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला होता. मात्र हा पुरस्कार नंदा खरे नाकारला आहे. यामागे कुठलंही वादाचं कारण नाही. हा पुरस्कार मी स्वइच्छेनं नाकारतो आहे असं त्यांनी म्हटलयं. 

हेही वाचा - आता कोरोनाच्या अहवालात होणार नाही छेडछाड; चाचणीच्या पारदर्शकतेसाठी 'QR' कोड, नागपुरात...

काय म्हणाले नंदा खरे 

"आज माझ्या 'उद्या' या  कादंबरीला साहित्य अकादमीचा सन 2020 चा पुरस्कार जाहीर झाला. मात्र ४ वर्षांपूर्वी मी कुठलाही पुरस्कार न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मी हा ही पुरस्कार स्वीकारत नाही. पुरस्कार प्रदान करणाऱ्या सर्वांचा मान राखून मी हा पुरस्कार नाकारत आहे." अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. 

काय आहे पुरस्कार नाकारण्यामागचं कारण 

"मला समाजाकडून भरपूर प्रेम मिळालं आहे त्यापेक्षा मला अधिक काहीच नको. म्हणूनच मी पुरस्कार नाकारत आहे. यामागे इतर कुठलंही कारण नाही." असंही नंदा खरे यांनी स्पष्ट केलंय. 

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

loading image
go to top