sakal

बोलून बातमी शोधा

QR code scanning for transparency of corona test in nagpur

कोरोना चाचणी झालेल्या प्रयोगशाळेत चाचणी अहवाल आल्यानंतर या अहवालावर 'क्यूआर कोड' लावण्यात येतो. हा कोड स्कॅन केल्यानतंरच संबंधित व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे, हे कळण्यास मदत होईल, असा या संशोधनातून पुढे आले असल्याचा दावा खासगी पॅथालॉजीतर्फे करण्यात आला आहे.

आता कोरोनाच्या अहवालात होणार नाही छेडछाड; चाचणीच्या पारदर्शकतेसाठी 'QR' कोड, नागपुरात सुरू झाला पहिला प्रयोग

sakal_logo
By
केवल जीवनतारे

नागपूर : कोरोना चाचणीच्या अहवालात तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सहज छेडछाड करता येते. पॉझिटिव्हचे निगेटिव्ह करण्यात आल्याच्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. असे गैरप्रकार रोखण्यासाठी कोरोना अहवालावर क्यूआर कोडचा पर्याय पुढे आणला आहे. क्यूआर कोडचा वापर केल्यास यात केवळ ज्यांचा अहवाल आहे, त्यांनाच अहवाल बघता येईल. या पर्यायाचा वापर खासगी आणि शासकीय प्रयोगशाळांमध्ये सहज करता येईल.

हेही वाचा - लॉकडाउन म्हणजे वेडेपणाचा निर्णय, संदीप जोशींची पालकमंत्र्यांवर टीका

कोरोना चाचणी झालेल्या प्रयोगशाळेत चाचणी अहवाल आल्यानंतर या अहवालावर 'क्यूआर कोड' लावण्यात येतो. हा कोड स्कॅन केल्यानतंरच संबंधित व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह आहे, हे कळण्यास मदत होईल, असा या संशोधनातून पुढे आले असल्याचा दावा खासगी पॅथालॉजीतर्फे करण्यात आला आहे. खासगी आणि सरकारी अशा दोन्ही प्रकारच्या लॅबमध्ये दररोज दहा ते ११ हजार कोरोना चाचण्या सध्या होत आहेत. खासगी प्रयोगशाळांचा विचार करता त्यांच्यातर्फे आलेले अहवाल सत्य तपासणीसाठी कोणतीही यंत्रणा नाही. यामुळेच अनेकदा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण लगेच दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह आले असल्याचे प्रकार नागपुरात घडले आहेत. विशेष असे की, सर्वाधिक चाचण्या या खासगी प्रयोगशाळांमध्येच होत आहे. 

हेही वाचा - VIDEO : भाजपचे माजी मंत्री पोलिसांना म्हणाले 'तुम्ही सरकारचे कुत्रे'; पाहा...

कोड स्कॅनिंगनंतरच दिसेल अहवाल -
विदर्भातील इतर जिल्ह्यांतूनही कोरोना चाचणीसाठी घेण्यात आलेले नाक किंवा घशातील द्रवाचे नमुने नागपुरात तपासणीसाठी येतात. याशिवाय गर्भवतींच्या प्रसूती, गंभीर शस्त्रक्रिया करण्यापूर्वी कोरोना चाचणीचा अहवाल सक्तीचे केले आहे. अशावेळी चुकीचा अहवाल गेल्यास त्याचा फटका संबंधित रुग्णासह उपचार करणारे डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील इतर रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांनाही बसण्याची शक्यता आहे. काही दिवसांपासून कोरोना चाचणीचा अहवाल स्वतःच्या मर्जीनुसार तयार करून घेत असल्याचेही पुढे आले आहे. पीडीएफ स्वरूपातील चाचणी अहवालातील नाव , टेस्ट स्टेटस सहजरीत्या बदलविता येतो . अशा परिस्थितीत क्यूआर कोड चा वापर झाल्यास यावर नियंत्रण आणता येईल. क्यूआर कोड स्कॅन झाल्यानंतरच रुग्णाचा मूळ अहवाल मोबाइलवर प्राप्त होईल , अशी माहिती या कोडसाठी पुढाकार घेणारे डॉ. दिनेश अग्रवाल यांनी दिली. 
 

go to top