bribe of three and half lakhs two jailed along with EPF commissioner nagpur crime
bribe of three and half lakhs two jailed along with EPF commissioner nagpur crimeSakal

Nagpur News : साडेतीन लाखांची लाच भोवली; लाचखोर ईपीएफ आयुक्तांसह दोघांना कारावास

दोषी अधिकाऱ्यांमध्ये तत्कालीन प्रादेशिक आयुक्त सुरेंद्र व्ही. आझाद आणि अंमलबजावणी अधिकारी अजय भालचंद्र पहाडे यांचा समावेश आहे.

नागपूर : औद्योगिक क्षेत्रात सेवा देणाऱ्या कंपनीच्या संचालकांचे लेखा परीक्षण सुरळीतपणे पार पाडण्यासाठी ३.५० लाख रुपयांची लाच मागणाऱ्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाचे प्रादेशिक आयुक्त आणि अंमलबजावणी अधिकाऱ्याला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवून पाच वर्षांचा कारावास आणि दोन लाख रुपयांचा दंड ठोठावला.

दोषी अधिकाऱ्यांमध्ये तत्कालीन प्रादेशिक आयुक्त सुरेंद्र व्ही. आझाद आणि अंमलबजावणी अधिकारी अजय भालचंद्र पहाडे यांचा समावेश आहे. न्यायाधीश आर. एस. पावसकर यांनी हा निर्णय दिला. पहाडे यांची नियुक्ती अजूनही नागपुरात आहे, तर आझाद सध्या चेन्नईत कर्तव्यावर आहेत.

सीबीआय नागपूर शाखेने १७ मार्च २०१९ रोजी एम. एस. इंडस्ट्रिअल सर्व्हिसेस कंपनीचे संचालक सौरभ सिंग भारद्वाज यांच्या तक्रारीवरून दोन्ही दोषींविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याचे कलम ७ अ आणि गुन्हेगारी कट रचल्याचा गुन्हा दाखल केला होता.

सौरभ सिंग हे उद्योगांना मजूर पुरवण्याचे काम करतात. २०१९ मध्ये आझाद प्रादेशिक आयुक्त म्हणून तर पहाडे हे अंमलबजावणी अधिकारी म्हणून कार्यरत होते. अर्ज करूनही विभागाकडून सौरभ यांच्या कर्मचाऱ्यांच्या ईपीएफचे लेखापरिक्षण करण्यात आले नाही.

असे असतानाही त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. सौरभ यांनी पहाडे यांची भेट घेतली. सात वर्षांचे लेखापरीक्षणासाठी वर्षाला ५० हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी सौरभने सीबीआयकडे तक्रार केली. प्राथमिक तपासानंतर सापळा रचून दोघांना ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. तक्रारदारातर्फे ॲड. विक्रमजित यादव यांनी बाजू मांडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com