esakal | झुरळ मारून अंगणात का फेकले, यावरून शेजा-याने घडविले "महाभारत'
sakal

बोलून बातमी शोधा

मौदा ः क्षुल्लक कारणावरून घरात घुसून हल्लेखोरांनी केलेली साहित्यांची नासधूस.

तारसा गावातील शेषराव कोलबाजी येळणे (वय 42) व श्रीरंग डोकरीमारे हे एकमेकांशेजारी राहतात. 20 एप्रिल रोजी शेषराव येळणे यांचा लहान मुलगा क्रिश (वय 10) हा सायंकाळी साडेसातच्या सुमारास अंगणात खेळत होता. एवढ्यात क्रिशने अंगणात झुरळ बघितले. त्याला मौज आली. त्याने हाताने झुरळ मारले व ते फेकून दिले. ते मृत झुरळ शेषराव येळणे यांच्या शेजारी राहणाऱ्या श्रीरंग डोकरीमारे यांच्या अंगणात जाऊन पडले.

झुरळ मारून अंगणात का फेकले, यावरून शेजा-याने घडविले "महाभारत'

sakal_logo
By
पुरूषोत्तम डोरले

मौदा (जि.नागपूर) : "झुरळ' हा किटकवर्गीय प्राणी आहे आणि तो कुणाचे काय बिघडवू शकतो बरे ! पण कोरोनासारखा अदृश्‍य विषाणू व झुरळासारखा दृश्‍य किटकामुळेही या जगात "महाभारत' घडू शकते. मौदा तालुक्‍यातील तारसा येथे चक्‍क क्षुल्लक झुरळावरून मोठे भांडण झाले. झुरळ मारून माझ्या अंगणात का फेकले, या क्षुल्लक कारणावरून भांडण एवढे विकोपाला गेले की, हल्लेखोरांकडून घरात शिरून महिलेची ओढताण, शेडमधील कार, दुचाकीं, टेबल-खुर्च्या, पंख्याची तोडफोड तोडफोड केल्याची घटना मौदा पोलिस ठाण्यांतर्गत तारसा येथे घडली. वाचकांनो, हे वाचून माणसाच्या या विचित्रपणाला काय म्हणावे हे कळत नाही.

अधिक वाचा:  मुख्यमंत्री महोदय,ओडिशातील गर्भवती पत्नीला भेटू द्या हो !

हल्लेखोर बोलावून साहित्यांची केली तोडफोड
तारसा गावातील शेषराव कोलबाजी येळणे (वय 42) व श्रीरंग डोकरीमारे हे एकमेकांशेजारी राहतात. 20 एप्रिल रोजी शेषराव येळणे यांचा लहान मुलगा क्रिश (वय 10) हा सायंकाळी साडेसातच्या सुमारास अंगणात खेळत होता. एवढ्यात क्रिशने अंगणात झुरळ बघितले. त्याला मौज आली. त्याने हाताने झुरळ मारले व ते फेकून दिले. ते मृत झुरळ शेषराव येळणे यांच्या शेजारी राहणाऱ्या श्रीरंग डोकरीमारे यांच्या अंगणात जाऊन पडले. या क्षुल्लक कारणावरून श्रीरंग डोकरीमारे यांच्या पत्नीने येळणे यांच्या मुलगा क्रिशला शिवीगाळ केली.

 अधिक वाचा:  कोरोनाने आणले विदर्भातील   या'क्रिकेटपटूंच्या "लग्नात विघ्न'!

घराबाहेर निघ, नाहीतर...
21 एप्रिलला शेषराव येळणे, त्याचा लहान भाऊ इंद्रपाल, पत्नी ऊर्मिला येळणे घरी बसले असता, सायंकाळी आरोपी इंद्रराज पटिये, रमेश पटिये, जितू पटिये, सूरज खंडाईत, आकाश खंडाईत, अमित डोकरीमारे (सर्व रहिवासी तारसा) तसेच दुर्गेश पटिये ( रा. पारडी), सुमित मनगटे (रा. खंडाळा) व इतर साथीदार यांना घेऊन शेषराव येळणे यांच्या घरावर हल्ला करण्याच्या उद्देशाने हातात लाठ्याकाठ्या घेऊन आले. अश्‍लील शिवीगाळ करीत घराबाहेर निघ, नाहीतर तुझे खांड करू, अशी धमकी इंद्रराज पटिये व त्याचे साथीदार देऊ लागले. भीतीपोटी शेषराव येळणे घरामागे लपला. तेवढ्यात आरोपी इंद्रराज व त्याचे साथीदार यांनी शेषराव येळणे यांच्या घरासमोरील टीनाच्या शेडमध्ये घुसून मारुती व्हॅन, ऍक्‍टिवा दुचाकी, टेबल-खुर्च्या पंखा आदी साहित्यांची तोडफोड सुरू केली. त्यांना रोखण्यासाठी मध्ये गेलेल्या शेषरावची पत्नी ऊर्मिला यांनाही धक्कामुक्की केली व आरोपींने महिलेचा विनयभंग केला. तुझा नवरा कुठे आहे? घराबाहेर काढ, असे म्हणत शिवीगाळ करीत आरोपी तिथून परत गेले.
शेषराव येळणे व त्यांच्या पत्नीने मौदा पोलिसांत जाऊन घडलेल्या घटनेची तक्रार केली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी इंद्रराज पटिये, रमेश पटिये, जितू पटिये, आकाश खंडाईत, अमित खंडाईत, अमित डोकरीमारे, दुर्गेश पटिये, सुमित मनगटे या सर्वांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, गुन्हा दाखल होऊन आज एक दिवसाचा कालावधी उलटला तरी अजूनही आरोपींना अटक झाली नाही. पुढील तपास मौदा ठाणेदार मधुकर गीते यांच्या मार्गदर्शनात हेडकॉन्स्टेबल संजय देशमुख करीत आहेत.  

loading image
go to top