esakal | संत्रा, मोसंबीवर ब्राऊन रॉट रोग; 'असा' टाळा प्रादुर्भाव
sakal

बोलून बातमी शोधा

orange

संत्रा, मोसंबीवर ब्राऊन रॉट रोग; 'असा' टाळा प्रादुर्भाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : जिल्ह्यात संत्रा (orange) व मोसंबीवर (sweet lime) फायटोप्थोरा ब्राऊन रॉट या रोगाचा प्रादुर्भाव काटोल, नरखेड तालुक्यात दिसून आला आहे. फायटोफोप्थोरा ब्राऊन रॉट हा एक फळाचा रोग आहे. हा रोग सतत दमट हवामान व पाण्याच्या निचरा न होण्याशी संबंधित आहे. (brown rot disease on orange and sweet lime in nagpur)

हेही वाचा: कलिंगडाच्या बिया फेकू नका, घरांच्या भेगा बुजविण्यासाठी होणार वापर

पावसाळ्याच्या उत्तरार्धात आगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात जास्त प्रमाणात पाऊस पडल्यानंतर या रोगाचा प्रादुर्भावा समान्यत: दिसून येतो. या कालावधीमध्ये या फळगळ रोगामुळे हा शेतकऱ्यांना गोंधळात टाकणारी असते. या रोगाची लक्षणे प्रामुख्याने सुरुवातीला परिपक्व किंवा परिपक्व होण्याच्या स्थितीत असलेल्या फळांवर आढळून येते. सुरुवातीला पाणी शोषण केल्यासारखे घट्ट चमड्यासारखे चट्टे आढळून येतात. परंतु, ते लवकर मऊ होतात आणि पृष्ठभागावर बुरशीच्या पांढुरक्या मायसेलियाची वाढ होते. संक्रमित फळ अखेरीस गळून जमिनीवर पडतात. फांद्या, पाने, व मोहोर तपकिरी रंगाचे होऊन झाडे मरतात. या रोगाची सर्वात गंभीर बाब म्हणजे फळ तोडणीच्या आधी फळांवर लक्षणे दिसत नाही. साठवण आणि वाहतूकीच्या दरम्यान संक्रमित फळे निरोगी फळात मिसळल्यास चांगले फळांना या रोगाची लागण होऊन रोगाचा प्रसार होतो. हा रोग फायेटोप्थोराच्या दोन प्रजातीमुळे होतो.

असे करा व्यवस्थापन -

या ब्राऊन रॉटच्या व्यवस्थापन प्रतिबंधावर अवलंबून असते. ज्यामध्ये जमिनीपासून २४ इंच किंवा त्यापेक्षा जास्त उंचीवरून झाडाची छाटणी केल्याने या रोगांचे प्रमाण कमी करता येते. जून, जुलैमध्ये किंवा पहिल्या पावसाच्या अगोदर कॉपर युक्त बुरशीनाशकाची १ टक्के बोडॅक्स मिश्रण किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड ॲट ३.० ग्रॅम प्रति लीटर पाण्यात फवारणी केल्यास दमट हंगामात संरक्षण प्रदान करता येईल. पाऊस जास्त पडल्यास ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या महिन्यामध्ये बुरशीनाशकाची पुन्हा फवारणी करावी. या रोगाचा गंभीर धोका असल्यास उत्पादकांना संक्रमित फळबागांमध्ये फॉसेटिल अल्युमिनियम किंवा मेफेनोक्झाम एमझेड ॲट २.५ ग्रॅम प्रति लीटर पाण्यात फवारणी करावी, असे आवाहन केंद्रीय लिंबुवर्गीय फळ अनुसंधान संस्थाचे डॉ. डी. के. घोष यांनी केले.

loading image