Video : या जिल्ह्यातील तेरा गावे बफर झोन घोषित; गवातच निर्जंतुकीकरण फवारणी 

Buffer zone declared in thirteen villages in Nagpur district
Buffer zone declared in thirteen villages in Nagpur district

टेकाडी (जि. नागपूर) : महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच आहेत. पारशिवणी तालुक्‍यातील कन्हान येथील रहिवासी साठ वर्षीय वृद्धाला कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने सुरक्षेची बाब म्हणून कन्हान लगत असलेला तीन किमी आणि सात किमी असा बफर झोन परिसर तयार केल्याची माहिती गट विकास अधिकारी प्रदीप बमनोटे यांनी दिली. ऐवढ्या परिसराची सीमा सील केली असून, गावातच निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात येत आहे. 

कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण राहत असलेल्या लोहिया ले-आउट परिसराला कंटनमेंट प्रतिबंधित परिसर घोषित करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण कन्हानमध्ये देखील नगर परिषद प्रशासनाने सुरक्षेसंदर्भात काही परिसर बफर झोनमध्ये परिवर्तित केला आहे. याच पार्श्‍वभूमीवर पंचायत समिती तालुका प्रशासनातर्फे सुरक्षेसंदर्भात परिसरातील टेकाडी (को. ख.), कांद्री, वराडा, गोंडेगाव, जुनी कामठी, खंडाळा घटाटे, जुनी कामठी, नीलज, बोरी, सिंगारदीप, बोर्डा गनेशी, नांदगाव अशी तेरा गावे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणजे बफर झोनमध्ये सामील करून घेतलेली आहेत. 

बफर झोनअंतर्गत बाहेरून येणाऱ्या इसमांना गावात प्रवेश बंद केल आहे. गावाबाहेर जाणारे आणि गावात येणाऱ्या नागरिकांची माहिती लिखित स्वरूपात ठेवण्याचे आदेश ग्राम पंचायतला दिले आहे. अत्यावश्‍यक सेवेत मोडणाऱ्यांना सहकार्य करून सरकारकडून कोरोना संदर्भात लावण्यात आलेल्या गाईडलाईनचे पालन करण्याच्या सूचना ग्रामस्थांना देण्याचे आदेश दिले आहे. 

आरोग्य विभाग आणि आशा वर्कर्स यांनी "डोर टू डोर' जाऊन कोरोना सुरक्षे संदर्भात माहिती आणि तपासनी करून घेणे बफर झोनमध्ये गरजेचे आहे. कारण, कन्हान सहगावची गावे सील झाल्याने इथे नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्‍न निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. कोरोनाचा संक्रमन थांबावा व नागरिकांना कोरोना महामारीपासून सचेत करणे आवश्‍यक असल्याचे मत प्रदीप बमनोटे यांनी व्यक्‍त केले आहे.

ग्राम पंचायतने स्वतः दखल घेणे आवश्‍यक

कन्हान शहराला लागून असल्याने काही गावांना ग्राम पंचायत स्तरावर बफर झोनमध्ये परिवर्तित करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. यात कोरोना गाईडलाईनचे उल्लंघन होणार नाही याची ग्राम पंचायतने स्वतः दखल घेणे आवश्‍यक आहे. अत्यावश्‍यक सेवेतील नोकर वर्ग आणि जीवनावश्‍यक वस्तूंच्या संदर्भात परवानगी असलेल्यांना प्रशासनाने पुढाकार घेऊन सूट द्यावी. 

नागरिकांची होतेय फजिती

प्रशासनाचे पत्र स्थानिक ग्राम पंचायतींना येताच ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासनांनी गावचे गाव सील केले असून, बाहेरील व्यक्तींना गावात येण्याची परवानगी नाकारली आहे. अश्‍यात मात्र अत्यावश्‍यक सेवेत मोडणाऱ्या नागरिकांची फजिती होत आहे. याकडे स्थानिक प्रशासन आणि तालुका प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com