

Police probe underway after shocking ₹1.5 crore fraud involving builder, cashier and forged documents.
esakal
नागपूर : शहरात फसवणूकीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हुडकेश्वर परिसरात ठकबाज बिल्डरने बनावट स्वाक्षरी आणि खोट्या कागदपत्राच्या आधारे २५ लाखाचा गंडा घातला तर प्रतापनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका सुपरमार्केटमधील ठकबाज रोखपालाने १ कोटी १५ हजार रुपयांची रोख लंपास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करीत चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.