
बुलडाणा : सोयाबीन व कापसाची दरवाढ, पीकविमा, सरसकट कर्जमाफीसह इतर शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी बुधवारी १९ मार्च रोजी मुंबईत पुकारण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनापूर्वीच राज्य सरकारने बुलडाणा पोलिसांना पुढे करून क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाभरातील सर्व पदाधिकाऱ्यांना रात्रीच ताब्यात घेऊन हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या घरीदेखील मोठ्या प्रमाणात पोलिस धडकले आहे. तुपकर हे भूमिगत झाले असून, मुंबईतील उद्याचे आंदोलन होईलच, असे ठणकावून सांगितले आहे.