नागपूर - कोणतीही जमीन किंवा घर खरेदी करताना त्याची रजिस्ट्री करणे अत्यंत आवश्यक असते. रजिस्ट्रीशिवाय ती संपत्ती आपल्या मालकीची होऊ शकत नाही. यासाठी रजिस्ट्री शुल्कही शासन आकारते. परंतु, आपलीच जमीन आपल्याच मुला-बाळांच्या नावावर करताना शासनातर्फे त्यावर शुल्क आकारले जात आहे. त्यामुळे, याचा भार एका कुटुंबाच्या संपूर्ण वंशावळीला सोसावा लागतो. या नियमांमध्ये बदल करावा, अशी अपेक्षा सामान्य करीत आहे.