
भिवापूर : गडचिरोलीहून नागपूरकडे रुग्ण घेऊन निघालेल्या शासकीय १०८ रुग्णवाहिकेला शनिवारी (ता.२८) दुपारी उमरेड-भिवापूर मार्गावरील गोंडबोरी फाट्याजवळ अचानक आग लागून भीषण स्फोट झाला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत रुग्ण आणि नातेवाईकांना बाहेर काढल्याने जीवितहानी टळली.