बस-ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; १७ जखमी, पोलिस तातडीनं घटनास्थळी

जखमींना ट्रॅव्हल्सच्या बाहेर काढून शासकीय रुग्णालयामध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू होती.
Nagpur
Nagpursakal

चांपा : नागपूर उमरेड महामार्ग क्र.MH353D रोडवरील पाचगाव बस स्टॉप जवळ बस आणि ट्रॅव्हल्स चा अपघात होऊन जवळपास १७ जण जखमी झाल्याची घटना आज गुरुवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ११.१५मी घडली आहे. जखमींवर प्राथमिक आरोग्य केंद्र पाचगाव रुग्णालयामध्ये उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अशी माहिती पाचगाव प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर चंद्रसुरेश डोंगरवार यांनी दिली आहे.

नागपूर उमरेड महामार्गवरील पाचगाव बस स्टॉप जवळ उमरेडहून नागपूरकडे जाणाऱ्या श्री ताज ट्रॅव्हल्स क्रमांक MH.49.J.2390 आणि एस टी.बस क्रमांक MH.40. N.9008 मौजा पाचगाव बस स्टॉप नजिकच्या परिसरात एसटी बस च्या मागून येणाऱ्या भरधाव श्री ताज ट्रॅव्हल्स बसच्या चालकाचे ट्रॅव्हल्स वरून नियंत्रण सुटले व ट्रॅव्हल्स एस.टी बसला मागून जोरदार धडक दिल्याने ट्रॅव्हल्स बस चालकाचा ट्रॅव्हल्स वरून ताबा सुटला आणि ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या बाजूला एका शेतात जाऊन ट्रॅव्हल्स अडकली एसटी बस, आणि श्री ताज ट्रॅव्हल्स मधील प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे .

या अपघातामध्ये बस आणि ट्रॅव्हल्स मधील जवळपास १७ जण जखमी झाली आहेत. जखमींना ट्रॅव्हल्सच्या बाहेर काढून शासकीय रुग्णालयामध्ये आणण्याची प्रक्रिया सुरू होती. घटनास्थळी कुही पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या पाचगाव पोलीस चौकीचे प्रभारी पोलीस उपनिरीक्षक शिवाजीराव बोरकर, हरिहर सोनकूसरे,स. फौं. विजय कुमरे, पोलीस अंमलदार पवन सावरकर, दुर्गेश डहाके पोलीस पोहोचले.अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींवर प्राथमिक आरोग्य केंद्र पाचगाव रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालय येथे हलवण्यात आली आहे. आतापर्यंत जवळपास सतरा जणांना पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती प्राथमिक आरोग्य केंद्र पाचगाव रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान अपघाताचे नेमके कारण समजू शकलेले नाही. रुग्णालयात जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.

हा भीषण अपघात घडण्याची माहिती मिळतात पाचगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये नागरिकांनी एकच गर्दी केली होती. तसेच जखमी व्यक्तींवर उपचार करण्यासाठी आणि त्यांना पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी मदत केल्याचे चित्र यावेळी पहावयास मिळाले. घटनेची माहिती मिळतात कुही पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमीना पाचगाव आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालयामध्ये धाव घेतली आहे. अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com