Lithium Refinery : देशातील पहिला लिथियम रिफायनरी प्रकल्प बुटीबोरीत; उपराजधानीत ४२ हजार ५३२ कोटींची गुंतवणूक
Nagpur News : बुटीबोरीतील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत भारताचा पहिला लिथियम रिफायनरी प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पात ४२ हजार ५३२ कोटींची गुंतवणूक केली जाणार असून, त्यातून देशाच्या ऊर्जा संसाधनांमध्ये आत्मनिर्भरता येईल.
नागपूर : भारत ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील लिथियम रिफायनरीसह बॅटरी उत्पादन प्रकल्प बुटीबोरीतील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीत उभारला जाणार आहे. हा देशातील लिथियम रिफायनरीचा पहिला प्रकल्प ठरणार आहे.