esakal | फेबिफ्लू औषधी तत्काळ खरेदी करा'; नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षांचे निर्देश

बोलून बातमी शोधा

null

फेबिफ्लू औषधी तत्काळ खरेदी करा'; नागपूर जिल्हा परिषद अध्यक्षांचे निर्देश

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या फेबिफ्लू औषधी तत्काळ खरेदी करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे यांनी आरोग्य विभागाला दिले. प्राथमिक आरोग्य केंद्रातील फेबिफ्लू औषधीचा साठा संपल्याचे वृत्त सकाळमध्ये प्रकाशित झाले होते.

हेही वाचा: निवडणुकीच्या काळात हात जोडून मतं मागणारे लोकप्रतिनिधी कोरोनाकाळात गेले कुठे? नागरिकांचा सवाल

रश्मी बर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य समितीची आज ऑनलाइन बैठक झाली. बैठकीत सदस्यांसह आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. असीम इनामदार सहभागी झाले होते. ‘सकाळ'मधील वृत्ताचे पडसाद आजच्या बैठकीत उमटले. औषधींचा तुटवडा पडता कामा नये. त्या तत्काळ खरेदी करण्याचे आदेश अध्यक्षांनी आरोग्य विभागाला दिले.

ग्रामीण भागातील कार्यरत असलेल्या बोगस डॉक्टरांकडे लोक उपचाराकरिता जातात. परंतु हे डॉक्टर प्रशिक्षित नसल्यामुळे नसून योग्य उपचार करत नाही. वेळेत योग्य निदान व उपचार होत नसल्यामुळे रुग्ण दगावत आहेत. यावर आळा बसविण्याकरिता बोगस डॉक्टर शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. आरोग्य सेवा देत असलेले डॉक्टर व आरोग्य कर्मचारी हे उत्तम रित्या काम करत असून त्यांना उपाययोजने करिता लागणारे साहित्य सॅनिटायजर, मास्क व पीपीई किट व आवश्यक साहित्यही पुरविण्याचे निर्देश त्यांनी दिलेत.

हेही वाचा: नागपुरात कुख्यात गुन्हेगाराचा 'गेम' करण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांनी आवळल्या चौघांच्या मुसक्या

कर्मचारी रुजूच झाले नाही

चार नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रावरून सत्ताधाऱ्यांची चांगलीच किरकिरी होत आहे. हे केंद्र सुरू केले परंतु कर्मचाऱ्यांअभावी अद्याप कार्यांन्वित झाले नाही. कंत्राटदाराकडून कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आल्याचे आजच्या बैठकीत आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. परंतु ते अद्याप रुजूच झाले नाही. त्यामुळे केंद्र सुरू करण्याचा फायदा काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

संपादन - अथर्व महांकाळ