नागपूरकरांना मिळणार हवेतून उडणारी बस; नितीन गडकरींनी दिली माहिती

नागपूरकरांना मिळणार हवेतून उडणारी बस; नितीन गडकरींनी दिली माहिती
Updated on

नागपूर: एकीकडे पुणेकरांना काल मेट्रोची भेट मिळाली आहे तर दुसरीकडे आता नागपूरकरांसाठीही एक हटके भेट मिळण्याची शक्यता आहे. नागपूरवासीयांना मिळणारी ही भेट काही साधीसुधी असणार नाहीये. नागपुरकरांचा प्रवास अधिक सहज-सोपा करणारी ही भेट निश्चितच अनोखी अशी असणार आहे. नागपुरात आता जमिनीवर नाही तर हवेत धावणाऱ्या बसेस लोकांच्या सेवेमध्ये येणार आहे. याबाबतची माहिती दिली आहे ती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी...! आपल्या रस्ते निर्मितीमुळे कौतुकास पात्र ठरणाऱ्या गडकरींनीच याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. (Flying bus in Nagpur)

नागपूरकरांना मिळणार हवेतून उडणारी बस; नितीन गडकरींनी दिली माहिती
नारायण राणेंच्या अडचणी संपेनात, आता BMC ने पाठवली कारणे दाखवा नोटीस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलंय की, नागपूरात हवेतून चालणारी केबल बस सुरू करणार आहोत, तसं सुतोवाच त्यांनी केलं आहे. दक्षिण नागपूरचे आमदार मोहन मते यांनी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेबाबत मागणी केली होती. त्यानंतर त्याबाबत बोलताना केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी उत्तरप्रदेशातील प्रयागराज पाठोपाठ नागपूरात देखील हवेतून धावणारी बस अर्थात केबल बस सुरू करणार असल्याचे जाहीर केलंय.

नागपूरकरांना मिळणार हवेतून उडणारी बस; नितीन गडकरींनी दिली माहिती
अर्थसंकल्पीय अधिवेशन : विधानसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब

या बसेसच्या व्यवस्थेसाठी गडकरी यांनी आराखडा तयार करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 35 ते 40 सीटर ही केबल बस सध्या फिलिपिन्समध्ये चालवली जात असून त्याच धर्तीवर नागपूरात ही केबल बस सुरू केली जाईल, असे गडकरी म्हणाले आहेत. नागपूरातील ही केबल बस पारडीहून रिंगरोड मार्गे लंडन स्ट्रीटपर्यंत जाईल. तेथून हिंगणा टी पॉईंट, डिफेन्सवाडी येथून व्हेरायटी चौकापर्यंत पर्यंत जाईल, अशीही माहिती त्यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

40-Year Illegal Quarrying Row: Collector Asked to Submit Report Within a Week
Yavatmal fake marriage case
veterinary officer corruption allegations
Gondia tehsil office bribery case
Marathi News Esakal
www.esakal.com