esakal | आवाजाच्या दुनियेत करियरच्या संधी, तंत्रज्ञांची वाढलीय मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

voice

आवाजाच्या दुनियेत करियरच्या संधी, तंत्रज्ञांची वाढलीय मागणी

sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : विज्ञान, वाणिज्य, अभियांत्रिकी, वैद्यकीय या पारंपरिक क्षेत्रात रोजगार मिळविताना अनेकांचे हाल होत आहेत. नव्या संधी आणि नवे क्षेत्र शोधू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आवाजाची एक नवी दुनिया (career opportunities in voice field) खुणावते आहे. प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक उपक्रम ऑनलाइन व्यासपीठाच्या माध्यमातून होत असल्याने आवाजाच्या या दुनियेत करियरच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. (career opportunities in the filed of voice)

हेही वाचा: 'ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला नाहीतर PM फंडमधून प्लांट का सुरू केले?'

या क्षेत्रात रेकॉर्डिंग, रेडिओ, टेलिव्हिजन, चित्रपट, जाहिराती, व्हिडिओ, वेबसाईट्स, संगणक, मोबाईल गेम्स आणि अशा अनेक गोष्टींसाठी तत्रज्ञांची गरज निर्माण होत आहे. यासाठी बारावीनंतर सहा महिन्यांचा प्रमाणपत्र, एक वर्षाचा डिप्लोमा, तीन वर्षे पदवी आणि दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहे. या माध्यमातून विद्यार्थी या क्षेत्रात पदार्पण करू शकतील. निर्मिती क्षेत्रामध्ये महसुलाच्या दृष्टीने हे एक आणि महत्त्वाचे मानले जाणारे क्षेत्र आहे. आपल्या देशामध्ये ध्वनी अभियांत्रिकीची व्याप्ती मर्यादित आहे.

परंतु, करमणूक उद्योगात वाढ होण्याची क्षमता मोठी आहे. त्यामुळे, साउंड तत्रज्ञांची मागणी सतत वाढत आहे. करिअर करण्यासाठी सिक्वेंसिंग, मास्टरिंग, एडिटिंग आणि रेकॉर्डिंग यासारख्या तांत्रिक कौशल्याच्या विशेष अभ्यासक्रमाचीसुद्धा निवड करता येते. योग्य अनुभवाने आणि शिक्षणामुळे स्टुडिओ मॅनेजर होण्याची संधी पुढे चालून येऊ शकते. या क्षेत्रात काम करण्यासाठी नवी दालने खुली होत आहेत. जोरदार स्पर्धा आहे. अशा ठिकाणांसाठी नोकरीच्या बरेचदा जाहिराती येत नाहीत. त्यामुळे, सध्यातरी विद्यार्थ्यानाच पुढाकार घेत या क्षेत्रातील पैलूंचा शोध घेत रोजगार मिळवावा लागेल.

''भविष्यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये ऑनलाइन व्यासपीठाचा उपयोग होणार आहे. ही गरज बघता प्रत्येक संस्थेमध्ये ही सगळी व्यवस्था सांभाळायला एका तंत्रज्ञाची गरज भासणार आहे. या कामांसाठी अशा कुशल माणसांचा शोध घेण्यात येईल, तो दिवस दूर नाही. साउंड इंजिनिअरींगसह लाइट इंजिनिअरिंग, ऑडिओ-व्हिडिओ इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये करियरच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. विद्यार्थ्यांना पायाभूत माहितीसाठी प्रात्याक्षिकाद्वारे अनुभव घ्यायचा झाल्यास नागपुरात या क्षेत्रात काम करणाऱ्यांकडे इंटर्नशिप करू शकतील.''

-किशोर बत्तासे, तंत्रज्ञ

आवाजाबाबत शिक्षण देणाऱ्या संस्था

  • संगीत विभाग (मुंबई विद्यापीठ)

  • फिल्म ॲंड टेलिव्हिजन इंन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे (केंद्र सरकार)

  • झी इंन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आर्ट, मुंबई

  • डिजिटल अकादमी ऑफ फिल्म स्कूल, मुंबई

loading image