esakal | ...अन् CBI छापेमारीनंतर दौऱ्यावर गेलेले अनिल देशमुख घाईघाईत परतले घरी

बोलून बातमी शोधा

anil deshmukh
...अन् CBI छापेमारीनंतर दौऱ्यावर गेलेले अनिल देशमुख घाईघाईत परतले घरी
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : सीबीआयची टीम छापेमारी करून अनिल देशमुखांच्या घरून निघाली होती. त्यानंतर आता पुन्हा एक टीम अनिल देशमुखांच्या घरी परतली आहे. त्यामुळे काटोल येथील कोरोना सेंटरची पाहणी करण्यासाठी गेलेले अनिल देशमुख आपला दौरा पूर्ण न करताच परतले आहेत. यावेळी ते घाईघाईमध्ये घरी परतताना दिसले.

हेही वाचा: रासायनिक खतांच्या किमतीत भरमसाट वाढ, दर आटोक्यात आणण्याची मागणी

सीबीआयची टीम आली होती. त्यांना आम्ही सहकार्य केलं. नागपूर जिल्ह्यातील कोविड सेंटरला भेट द्यायला काटोलला चाललो आहोत, अशी मोजकीच प्रतिक्रिया अनिल देशमुख यांनी दिली होती. जवळपास साडेदहा तासानंतर ही प्रतिक्रिया देऊन ते काटोला कोरोना परिस्थितीची पाहणी करण्यासाठी निघाले होते. मात्र, सीबीआयची टीम परत त्यांच्या घरी आली. त्यामुळे त्यांना दौरा अर्ध्यावरच सोडून परत यावे लागले.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयनं गुन्हा दाखल केला आहे. परमबीर सिंह यांच्या आरोपानंतर अनिल देशमुख यांना पदावरून पायउतार व्हाव लागलं होतं. त्यानंतर त्यांच्यावर करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांच्या आरोपाची सीबीआयनं चौकशी केली. शनिवारी सकाळी अनिल देशमुख यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली. अनिल देशमुख यांच्या मुंबईतील घर आणि इतर मालमत्तांवर सीबीआयनं छापेमारी केली आहे. सीबीआयनं मुंबईत बांद्रा, वरळी तसेच नागपूर येथील दहा ठिकाणी छापेमारी केली आहे. सीबीआयनं चौकशी केल्यानंतर दिल्लीमध्ये अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.