
नागपूर : मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ''संकल्प ते सिद्धी'' हा कार्यक्रम साजरा करण्यात येईल. या अंतर्गत मोदी सरकारच्या ११ वर्षांतील कामगिरीचे प्रदर्शन केले जाईल. देशातील विकसित पायाभूत सुविधा, रेल्वेचा विकास, शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, मेट्रोचे जाळे आणि जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. लवकरच तिसऱ्या स्थानावर जाणार आहे. ही उपलब्धी या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचली जाणार आहे. अशी माहिती भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली.