esakal | नागपूर : मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध; कुख्यात कैद्यांमध्ये वर्चस्वासाठी राडा
sakal

बोलून बातमी शोधा

नागपूर : मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध; वर्चस्वासाठी राडा

नागपूर : मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध; वर्चस्वासाठी राडा

sakal_logo
By
अनिल कांबळे

नागपूर : मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या गुन्हेगारांमध्ये वर्चस्वासाठी मोक्का आणि हत्याकांडाच्या कुख्यात कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची खळबळजनक घटना काल आज उघडकीस आली. यात कैदी जखमी झाले. या प्रकरणी धंतोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Central-Jail-Nagpur-Fighting-between-notorious-prisoners-Nagpur-crime-crime-in-Nagpur-nad86)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू तायवाडे (२७), मोनू समुंद्रे (२६), अमीर पटेल (२८), शेख रिजवान (३२) हे चौघेही पाचपावली पोलिस ठाण्याअंतर्गत मोक्काचे आरोपी असून, मोका न्यायालयाच्या आदेशाने कारागृहात आहेत. तसेच प्रज्वल शेंडे (२४) हा मानकापूर तर संतोष गोंड (२५) हा एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत हत्याकांडाच्या गुन्ह्यात बंदिस्त आहे.

हेही वाचा: भाजपशी जवळीक असलेला ओबीसी चेहरा राष्ट्रवादीच्या गळाला

कारागृहाच्या आत न्यायालयीन बंदी म्हणजेच कच्चे कैदी आणि गुन्हा सिद्ध झालेल्या आरोपींसाठी पक्के कैदी यांच्यासाठी वेगवेगळे बॅरेक आहेत. मोक्का आरोपातील न्यायबंदींचे बॅरेक जवळ जवळच आहेत. एक वर्षापूर्वी अमीर पटेल यास कैदी शेख रिजवान, प्रज्वल शेंडे आणि संतोष गोंड यांनी मारहाण केली होती. त्याचा वचपा काढण्यासाठी सौरभ आणि मोनू संधीच्या शोधात होते.

संधी मिळताच मंगळवारी सायंकाळी त्यांच्यात राडा झाला. त्यांनी बॅरेक क्रमांक ५ च्या मागील बाजूस शेख रिजवानवर हल्ला केला. त्याच्या डाव्या गालावर लोखंडी पट्टीने मारून गंभीर जखमी केले. या मारहाणीत मोनू हा सुध्दा जखमी झाला. टोळी युद्ध सुरू असतानाच प्रचंड धावपळ उडाली. याघटनेची माहिती कारागृह सुरक्षा रक्षकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर उपचार करून बॅरेक मध्ये डांबले. मात्र, या घटनेमुळे नव्या न्यायबंदीतांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या प्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला.

(Central-Jail-Nagpur-Fighting-between-notorious-prisoners-Nagpur-crime-crime-in-Nagpur-nad86)

loading image