Central Railway: सहा रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल! नागपुर स्थानकावरुन जाणार 'या' गाड्या

दक्षिण-मध्य रेल्वेतर्फे वारंगल, सुररेड्डीपलेम आणि ओंगोल स्थानकांवर तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी नॉन इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमोल्डिंगचे काम करण्यात येणार आहे.
Central Railway
Central Railwayesakal

Southern Changes in Schedule : दक्षिण-मध्य रेल्वेतर्फे वारंगल, सुररेड्डीपलेम आणि ओंगोल स्थानकांवर तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी नॉन इंटरलॉकिंग आणि यार्ड रिमोल्डिंगचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सहा रेल्वेगाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आले आहे. विशाखापट्टणम नवी दिल्ली एक्स्प्रेस आणि नवी दिल्ली- विशाखापट्टणम एक्स्प्रेसचे ९ ते १७ डिसेंबरदरम्यान मार्गात बदल करण्यात आले आहे.

विशाखापट्टणम - गांधीधाम एक्स्प्रेसचे ७ ते १४ डिसेंबर, गांधीधाम- विशाखापट्टण एक्स्प्रेसचे १० ते १७ डिसेंबरदरम्यान, पुरी- ओखा एक्स्प्रेसचे १० ते १७ डिसेंबर आणि ओखा-पुरी एक्स्प्रेसचे ६ ते १२ डिसेंबदरम्यान मार्गात बदल करण्यात आले आहे.

या गाड्या विजयनगरम जंक्शन, रायगढा, टिटलागढ जंक्शन, रायपूर, नागपूर मार्गे धावणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे देण्यात आली. (Latest Marathi News)

Central Railway
Ayodhya Ram Mandir Inaguration: बॉलीवूडच्या फक्त पाचच सेलिब्रेटींनी निमंत्रण, चक्क कंगनाचं नाव वगळलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com