दीड महिन्यानंतर नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेल्या पथकासमोर अधिकाऱ्यानं दिलं अजब उत्तर; शेतकऱ्यांच्या उंचावल्या भुवया  

central team came for inspection of crops in Nagpur marathi news
central team came for inspection of crops in Nagpur marathi news

नागपूर : पाण्यामुळे पिकाचे पूर्ण नुकसान झाले. दोन महिने झाले तरी नुकसानीच्या मदती पैसे मिळाले नसल्याची व्यथा शेतकऱ्यांनी केंद्रीय पथकासमोर मांडली. पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. ऑगस्ट ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकाने केली. नागपूर जिल्‍ह्यातील कामठी, पारशिवनी,मौदा या तालुक्यातील सोनेगाव राजा, निलज, सिंगारदीप या गावांना भेटी दिल्या. कृषी, पायाभूत सुविधा, वीज व अन्य नुकसानाची पाहणी केली. शेतकऱ्यांशी चर्चा केली.

नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यात येणाऱ्या सोनेगाव राजा या कन्हान नदीच्या काठावरील गावाची केंद्रीय पथकाने पाहणी केली. गेल्या दोन महिन्यात शासनाकडून झालेली प्राथमिक मदत, सर्वेक्षण, पूरग्रस्तांची मागणी याबाबतची माहिती जाणून घेतली. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर पी सिंग यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे ,सीईओ योगेश कुंभेजकर प्रमुख्याने उपस्थित होते. शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती दिली. पावसामुळे प्रचंड नुकसान झाले. पूर्ण पीक गेले. यंदा काहीच हातात आले नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. नुकसानीची मदतही मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.

पथकाला दिसले हिरवेगार शेत

पथकाने शेताजीही पाहणी केली. त्यांना जवळपास सर्वच ठिकाणी हिरवेगार शेत दिसून आले. पुरामुळे झालेल्या नुकसानेचे चिन्ह, खुण दिसून आली नसल्याचे सांगण्यात येते.

नुकसानग्रस्त पुलाची पाहणी

पारशिवनी तालुक्यातील सालई- माहुली येथे पेंच नदीवरील पुलाच्या नुकसानीची पाहणी केंद्रीय रस्ते व दळणवळण आणि महामार्ग मंत्रालयाचे मुख्य अभियंता तुषार व्यास यांनी केली. मनसर- माहुली-सालई- बिटोली येथील पेंच नदीवरील पुलाचे बांधकाम २०१८ रोजी पूर्ण करण्यात आले होते. मध्य प्रदेशातील चौराई धरणातून २९ ऑगस्ट २०२० रोजी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे अचानक आलेल्या पाण्याच्या प्रवाहात पुलाचा काही भाग कोसळला आहे. पारशिवनीचे तहसीलदार वरुणकुमार सहारे, कार्यकारी अभियंता विशेष प्रकल्प नागपूर मिलींद बांधवकर, सहाय्यक अभियंता सुनील दमाहे, शाखा अभियंता ए. एस. महाजन, यांच्यासह मंडळ अधिकारी मंडळ राजेश घुडे, तलाठी विश्वजीत पुरामकर पाहणी पथकामध्ये आहेत.

अधिकाऱ्यांचे अजब उत्तर

९ आक्टोबरला राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यातील मदत निधी देण्यात आला. दीड महिन्याचा काळ लोटल्यावरही मदत निधी शेतकऱ्यांच्या खात्यात आला नाही. शेतकऱ्यांनी खाते क्रमांक चुकीचे दिल्याने पैसे मिळाले नसल्याचे अजब उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. यामुळे पथकातील अधिकाऱ्यांच्या भुवईया उंचावल्या. पथकजच्या दृष्टीकोनातून जिल्हाधिकारी यांनी आवश्यक आढावा घेतला नाही. निधी वाटपाबाबतही आढावा घेतला नसल्याचे मोठी अडचण झाल्याची चर्चा आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com