esakal | अटल बिहारी वाजपेयीनीं घेतला होता रामभाऊंच्या पाटोडीचा आस्वाद; नागपूरला अनेकदा दिली होती भेट
sakal

बोलून बातमी शोधा

Atal Bihari Vajpayee Birth Anniversary visited Nagpur many times and ate Patodi 

नागपूरचं आणि अटलजींचं एक अनोखं नातं होतं. नागपूरला त्यांनी अनेकदा भेट दिली होती. त्यात नागपूरची पाटोडी म्हणजे अटलजींनी आवडती.

अटल बिहारी वाजपेयीनीं घेतला होता रामभाऊंच्या पाटोडीचा आस्वाद; नागपूरला अनेकदा दिली होती भेट

sakal_logo
By
अथर्व महांकाळ

नागपूर: जनसामान्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा नेता म्हणून अटल बिहारी वाजपेयी प्रसिद्ध होते. राजकारणातील अजातशत्रू म्हणूनही त्यांची ओळख होती. त्यांची जीवनशैली, त्यांचे विचार, त्यांचा समस्यांकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या गुणांनी ते परिपूर्ण होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा मूलभूत गुण त्यांच्या अंगी होता. नेहमी माणसं जोडत त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशाला समर्पित केलं.  मात्र नागपूरचं आणि अटलजींचं एक अनोखं नातं होतं. नागपूरला त्यांनी अनेकदा भेट दिली होती. त्यात नागपूरची पाटोडी म्हणजे अटलजींनी आवडती. 

खरंतर अटलजींना नागपूर जवळचं का होतं याची दोन कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना नागपुरात झाली आणि अटलजी संपूर्ण आयुष्य संघाच्या विचारांवर ठाम होते. अगदी विद्यार्थी दशेपासून तर पंतप्रधान असेपर्यंत ते संघस्थानी आले. तर दुसरं कारण म्हणजे नागपुरात राहणारी त्यांची जिवलग माणसं. 

हेही वाचा - मृत्यू जवळ येताना दिसताच 'त्यांनी' घेतला महत्वाचा निर्णय; प्रेरणादायी काम करून मिळवलं अमरत्व

हाऊस किंवा शहरातील कुठल्याही हॉटेलमध्ये थांबत नव्हते. पाँडेचरीच्या राज्यपाल डॉ. रजनी राय, महालातील पं. बच्छराज व्यास आणि सुमतीताई सुकळीकर यांच्या निवासस्थानी ते थांबत होते. सुमतीताईंना अटलजी बहीण मानत. त्यांच्या कुटुंबात अटलजी पारिवारिक सदस्य म्हणून वावरायचे. २००० मध्ये नागपुरात भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होती. या बैठकीवेळी अटलबिहारी वाजपेयी यांचा तीन दिवस नागपुरात मुक्काम होता. विरोधी पक्षाच्या नेत्यांशीही त्यांचे चांगले संबंध होते. मदनगोपाल अग्रवाल यांना तर अटलजींनी खास जेवायला बोलावले होते.

झाशी राणी ते रिझव्‍‌र्ह बँक चौक पायी प्रवास

गोवारी समाजाचा १९९४ मध्ये विधानभवनावर मोर्चा निघाला होता आणि त्या मोर्चात झालेल्या चेंगराचेंगरीत ११४ बळी गेले होते.  देशभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. त्या घटनेच्या दोन दिवसानंतर अटलबिहारी वाजपेयी नागपुरात आले आणि झाशी राणी चौक ते रिझव्‍‌र्ह बँक चौकापर्यंत पायी जात त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी शासकीय रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली होती. गोवारी समाजाचे नेते दिवं. सुधाकर गजबे यांची भेट घेऊन त्यांच्याकडून माहितीही घेतली होती.

Success Story: केली अवघ्या १५ हजारांची गुंतवणूक अन् झाले कोटींचे मालक; युवा उद्योजकांची गगनभरारी 

बडकस चौकात पाटोडीचा आस्वाद

अटलजी नागपुरात आल्यावर व्यास यांच्या बडकस चौकातील निवासस्थानी राहत होते. व्यास यांच्या निवासस्थानापासून संघ कार्यालय जवळ असल्यामुळे ते सकाळी उठून शाखेत जात होते. पं. बच्छराज व्यास यांचे निधन झाल्यावर बडकस चौकात महापालिकेच्यावतीने त्यांचा पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. त्याचे उद्घाटन अटलजींच्या हस्ते झाले होते. त्यावेळी बडकस चौकात रामभाऊ पाटोडी म्हणून प्रसिद्ध होती. अटलीजींनी या पाटोडीचा मनसोक्त आस्वाद घेतला होता.