
गोंदिया/गडचिरोली : गोंदिया-बल्लारशाह रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला हिरवी झेंडी मिळाली असून, केंद्राकडून चार हजार ८१८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. यातून २४० किलोमीटर लोहमार्गाचे होणार निर्माण होणार असल्याची माहिती शुक्रवारी (ता. ११) दूरदृश्य आभासी परिषदेत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.