

Organ Donation
sakal
नागपूर : महापालिकेतील निवृत्त सफाई कामगार चंद्रमणी जामगडे दोन दिवसांपूर्वी घरीच भोवळ येऊन पडले. यात त्यांना मेंदूला इजा झाली. मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्याने मेंदूपेशी मृत झाल्याचे निदान झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. मात्र जामगडे कुटुंबीयांनी दुःखात दिवाळीच्या पर्वावर अवयवदानाचा निर्णय घेत तिघांचे आयुष्य उजळले.