loan Shark Harassment Case
esakal
चंद्रपूर : कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याला थेट आपली किडनी विकण्यास भाग पाडल्याची माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur Farmer) उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण समाजमन सुन्न झाले असून सावकारकीचा अमानवी चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे.