राज्य सरकारला निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण नकोय

राज्य सरकारला निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण नकोय
Updated on

नागपूर : सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला ओबीसीचा डेटा (OBC data) करायला सांगितला आहे. मात्र, महाविकास आघाडीमधील मंत्री मुद्दाम केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. त्यांना २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण नको (No OBC reservation in elections) आहे. यामुळे हे सर्व कारस्थान रचले जात आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात झारीचा शुक्राचार्य लपला आहे. त्याच्याकडून ओबीसी आरक्षणाला विरोध (Opposition to OBC reservation) केला जात असल्याचे भाजपचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Former Energy Minister Chandrasekhar Bavankule) यांनी पत्रकार परिषदेत केला. (Chandrasekhar-Bavankule-accuses-the-state-government-of-reservation)

महाविकास आघाडीकडून ओबीसी आरक्षणावरून जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न सुरू आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले होते. मात्र, चार ते पाच दिवसांतच जिल्हा व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाले. तेव्हा कुठे गेले तुमचे आश्वासन, असा प्रश्नही चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारला निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण नकोय
शहीद भूषण सतई यांच्या वडिलांची गळफास लावून आत्महत्या

सुप्रीम कोर्टाने ४ मार्च २०१९ रोजी न्यायमूर्ती कृष्णमूर्ती यांच्या जजमेंटप्रामणे कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारला दिले होते. समुचित आयोग तयार करा, डेटा तयार करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्य सरकार असे करायला तयार नाही. याची जबाबदारी राज्य सरकारची असता त्यांनी कुठल्याही हालचाली केल्या नाही. वाट पाहून थकल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने निवडणीचा कार्यक्रम घोषित केल्याचे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात झारीचा शुक्राचार्य

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात झारीचा शुक्राचार्य आहे. त्याच्याकडूनच ओबीसी आरक्षणाला मुद्दाम उशीर केला जात आहे. फक्त तीन महिन्यांत आरक्षणाचा डेटा तयार होऊ शकतो. फडणवीस सरकारनेही तीन महिन्यांत मराठा आरक्षणाचा डेटा तयार केला होता. ओबीसीचे २७ टक्के आरक्षण टिकवले होते. आम्ही आरक्षण घालवले असते तर निवडणूक झाल्याच नसत्या, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

राज्य सरकारला निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण नकोय
नागपुरातील वाकी येथे चौघांना जलसमाधी; पोहण्याचा मोह बेतला जिवावर

कोरोनामुळे कारण केले पुढे

छगन भुजबळ यांनी कोरोनात डेटा तयार करता येऊ शकत नाही, असे कारण पुढे केले होते. त्यांना मेळावे घेता येतात, बीअरबार सुरू करता येते. मात्र, डेटा तयार करता येत नाही. ओबीसीबाबत राज्य सरकारच्या मनात काळ आहे. २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुका लक्षात घेऊन त्यांच्याकडून कटकारस्थान रचले जात आहे, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

आता कुठे गेले तुमचे प्रेम

नाना पटोले, छगन भुजबळ व विजय वडेट्टीवार यांनी ओबीसींबाबत मोठे प्रेम दाखवले. मात्र, आता काहीही करायला तयार नाही. उलट ओबीसी समाजाची दिशाभूल केली जात आहे. १५ महिन्यांपासून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडून दिशाभूल केली जात आहे. ते या विषयावर काहीही बोलायला तयार नाही. ओबीसीला आरक्षण देण्यास सरकारचाच विरोध आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

राज्य सरकारला निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण नकोय
शेतकऱ्यांनो, थांबा... थांबा... आठवडाभर तरी जोरदार पाऊस नाहीच!

२६ जूनला राज्यभर आंदोलन

ओबीसी आरक्षणावर राज्य सरकारने लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा महाविकास आघाडीतील नेत्यांना आम्ही भटकू देणार नाही. भाजप २६ जूनला राज्यभर आंदोलन करणार आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com