Chhatrapati Shivaji Maharaj Forts Dress Code : शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर आता 'ड्रेसकोड'? छोटे कपडे घालण्यास बंदी घालण्याचा अखिल भारतीय मराठा महासंघाचा नागपुरात मोठा ठराव!

गडकिल्ल्यांचे पावित्र्य आणि ऐतिहासिक प्रतिष्ठा जपण्यासाठी पर्यटकांनी मर्यादित व योग्य पेहराव करावा; महासंघाच्या १२६ व्या वार्षिक आमसभेत प्रस्ताव सर्वानुमते मंजूर.
Resolution passed to implement 'Dress Code' for tourists on forts!

Resolution passed to implement 'Dress Code' for tourists on forts!

Sakal

Updated on: 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांची प्रतिष्ठा आणि पावित्र्य जपण्यासाठी तिथे येणाऱ्या पर्यटकांच्या पेहरावावर निर्बंध घालण्याचा मोठा ठराव अखिल भारतीय मराठा महासंघाच्या नागपूर येथे झालेल्या १२६ व्या वार्षिक आमसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. यासोबतच मराठा साम्राज्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी इंदूरमध्ये भव्य राष्ट्रीय अधिवेशन घेण्याची घोषणाही या बैठकीत करण्यात आली.

Loading content, please wait...