Bhushan Gavai : नागपूरकरांकडून होणार सरन्यायाधिशांचा सत्कार; हायकोर्ट बार असोसिएशनचे शनिवारी आयोजन
Nagpur News : नागपूर येथे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हायकोर्ट बार असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील न्यायमूर्ती, वकील आणि विधीक्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
नागपूर : सरन्यायाधीश भूषण गवई यांनी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आणि सरकारी वकील म्हणून नागपूर शहरात मोठी कारकीर्द घडविली. या दरम्यान त्यांना स्थानिक विधी क्षेत्राचे प्रेम लाभले.