नागपूर - गेल्या पंधरा दिवसांपूर्वी येथील व्यापारी महिला नागपुरात खरेदीसाठी आली असता बेपत्ता झाली होती. तिच्या बेपत्ता होण्यामागचे गूढ आता उलगडले आहे. बडतर्फ पोलिस कर्मचारी असलेल्या तिच्या वर्गमित्रानेच तिचा खून करून तिचा मृतदेह नागपूर शहरालगतच्या वेळाहरी गावाजवळील जंगलात पुरला.