Chlorine Gas Leak : गोधनीतील जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन गॅसची गळती; ५६ जण रुग्णालयात, २०० मीटर परिसरातील वस्त्या केल्या रिकाम्या

गोधनी येथील उधाननगर परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन गॅसची गळती झाल्याने सोमवारी मध्यरात्री परिसरात एकच खळबळ उडाली.
Chlorine Gas Leak at Godhani Water Treatment Plant

Chlorine Gas Leak at Godhani Water Treatment Plant

sakal

Updated on

नागपूर - गोधनी येथील उधाननगर परिसरातील जलशुद्धीकरण केंद्रात क्लोरीन गॅसची गळती झाल्याने सोमवारी मध्यरात्री परिसरात एकच खळबळ उडाली. गॅसचा तीव्र वास परिसरात पसरल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. खबरदारीचा उपाय म्हणून जलशुद्धीकरण केंद्राच्या २०० मीटर परिसरातील वस्त्या रिकाम्या करण्यात आल्या. या घटनेत सुमारे ५६ नागरिकांना विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यातील आठ जणांना अतिदक्षता विभागात (ICU) दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com