
दर्यापूर : न्यायालय हे नागरिकांच्या समस्या सुटण्याचे आशास्थान आहे. मात्र, अनेकदा न्यायाला विलंब होत यामुळेच न्यायालयांचे विकेंद्रीकरण होणे गरजेचे आहे. तसे झाल्यास न्याय लवकर मिळू शकतो, असे प्रतिपादन भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दर्यापूर मधील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात बोलताना केले.