Nagpur Crime : समाज कल्याण कार्यालयात लिपिकाचा गोंधळ; महिला अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी, बजाजनगर ठाण्यात गुन्हा दाखल
Crime News : नागपूरच्या समाजकल्याण कार्यालयात दारूच्या नशेत लिपिकाने गोंधळ घालत महिला अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिली. बजाजनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतले आहे.
नागपूर : बजाजनगरातील समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात वरिष्ठ लिपिकाने दारूच्या नशेत गोंधळ घालत महिला अधिकाऱ्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली. याप्रकरणी बजाजनगर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.