cm devendra fadnavis
sakal
नागपूर - येत्या दोन-तीन महिन्यांत महाराष्ट्र सरकार सात नवीन भविष्योन्मुख (फ्युचर रेडी) धोरणे जाहीर करणार असून, राज्याचा विकास आता पूर्णपणे धोरण आधारित असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. ‘अॅडव्हांटेज विदर्भ’ परिषदेच्या दुसऱ्या दिवशी आयोजित इंटरनॅशनल बिझनेस कॉनक्लेव्हमध्ये ते बोलत होते.