cm devendra fadnavis
sakal
नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या सात दिवसांच्या कालावधीवरून सर्वत्र ओरड होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भात होणाऱ्या या अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्यातील प्रश्नांवर जास्तीत जास्त चर्चा घडवून आणणार असल्याचे सांगितले.
या भागातील जनतेला न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार असल्याचे ते म्हणाले. विरोधकांनी पायऱ्यांवर घोषणाबाजी करण्याऐवजी सकारात्मक राहून सभागृहात चर्चा करावी, असे आवाहनही अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी केले.