
नागपूर: ‘‘ओबीसींची शक्ती काय आहे, हे त्यांच्या लक्षात आले आहे. वर्षानुवर्ष त्यांनी ओबीसी समाजाला केवळ पाण्यात बघितले. कोणत्याही प्रकारच्या योजना ओबीसी समाजापर्यंत पोहोचू दिल्या नाही. ओबीसी समाजासाठी त्यांनी केवळ भाषणाचे राजकारण केले. ओबीसी समाज दुरावल्याचे लक्षात आल्यावर विरोधक मंडल यात्रा काढत आहेत,’’ असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मंडल यात्रेला नुकतीच येथून सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी हे वक्तव्य केले.