
CM Devendra Fadnavis addresses concerns over OBC representation, assuring elections will follow the 27% reservation quota.
Sakal
नागपूर: सर्वोच्च न्यायालयात ठाकरे सरकारने योग्य बाजू मांडली नाही. यामुळे निवडणुकीत ओबीसींचे आरक्षण गेले. हे एकप्रकारे ओबीसींना राजकारणातून वंचित ठेवण्याचे षडयंत्र होते. मात्र, आम्ही न्यायालयात ओबीसींची भक्कमपणे बाजू मांडली. संपुष्टात आलेले २७ टक्के आरक्षण पुन्हा मिळाले. २७ टक्के आरक्षणानुसारच निवडणूका होतील असे सांगत राजकारणातून ओबीसींना वंचित ठेवण्याचे एकप्रकारे विरोधकांचे षडयंत्र होते, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केली.