
नागपूर : दक्षिण भारतातील आंध्रप्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांतून शहरात नारळाची आवक होते. यंदा उत्पन्न कमी झाल्याने आवकीमध्ये मोठी घट झाली असून, याचा परिणाम नारळाच्या दरावर झाला आहे. २० रुपयांना मिळणारा नारळ ४० आणि ५० रुपयांना मिळत आहे. ऐन श्रावण महिन्यात नारळाच्या किमतीत दुप्पट वाढ झाल्याने नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे.