
नागपूर : विदर्भातील थंडीच्या लाटेने आणखी तीव्र स्वरूप धारण केले असून, गेल्या चोवीस तासांत नागपूरसह सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमानात लक्षणीय घट झाली आहे. मंगळवारच्या तुलनेत नागपूरचा पुन्हा पारा दोन अंशांनी घसरून १० अंशांवर स्थिरावला. तर गोंदियात विदर्भासह संपूर्ण राज्यात नीचांकी तापमानाची नोंद करण्यात आली.