Nagpur News : तापमानात घट; प्राण्यांनाही भरली हुडहुडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nagpur News

Nagpur News: तापमानात घट; प्राण्यांनाही भरली हुडहुडी

नागपूर : उत्तर आणि पूर्व भारतात थंडीची लाट आली आहे. मैदानी भागात सुद्धा थंडीचा परिणाम जास्तच दिसत आहे. शहरातील तापमान आठ अंशापर्यंत घसरलेले आहे. या परिसरातील लोकांसोबत प्राण्यांसाठी देखील ही थंडी त्रासदायक ठरू लागली आहे.

यामुळे शहरामधील गोरेवाडा प्राणिसंग्रहालय आणि महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांना येथील व्यवस्थापनाने विशेष सुविधा केली आहे. येथे प्राण्यांच्या पिंजऱ्याबाहेर हिटर लावले गेले आहेत.

प्राणिसंग्रहालय हे स्थानिकांबरोबरच पर्यटकांमध्येही लोकप्रिय आहे. दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या प्राणिसंग्रहालयात वाघ बिबट, अस्वल, हरिण, निलगायीसह निरनिराळे प्राणी, पक्षी आहेत.

पिंजऱ्यातील प्राण्यांना थंडी वाजू नये म्हणून ग्रीन नेट आणि गवतासह ताडपत्रीचा देखील वापर करण्यात आला आहे. थंड हवा पिंजऱ्यात जाण्यापासून रोखण्यासाठी या ग्रीन नेट वापरली जात आहेत.

थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागला आहे. गोरेवाडा आणि महाराज बागेतील प्राण्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.

प्राण्यांनाही भरली हुडहुडी

वातावरणातील आणि ऋतूमध्ये होणाऱ्या बदलाचा परिणाम प्राण्यांवर होतो. यामुळे प्रशासनाकडून उपाययोजना राबवून त्यांचे पालन पोषणासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. पशुपक्षांना नैसर्गिक ऊब मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

प्राण्यांना थंडीचा त्रास होऊ नये यासाठी हिटरही लावण्यात आले आहेत.

पर्यटकांमध्ये वाढ

शहरातील प्रेक्षणीय स्थळ म्हणून गोरेवाडा प्राणिसंग्रहालय महाराज बागेकडे बघितले जाते. याशिवाय गोरेवाडा रेस्क्यू सेंटरही आहे. या सर्वच ठिकाणी वाघ, बिबट, अस्वल, सांबर, नीलगाय आहे. यांच्यासाठी हिटर लावण्यात आलेले आहे.

या दोन्ही प्राणिसंग्रहालयात सध्या पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी प्राण्यांची काळजी घेतली जात आहे.

पिंजऱ्यात हिटरची व्यवस्था

रात्रीच्या वेळी गार वार आणि थंडी लागू नये म्हणून पिंजऱ्याभोवती ग्रीन मॅट लावली आहे. तसेच नैसर्गिक अधिवासात ऊब मिळावी यासाठी वाळलेला पालापाचोळा, लाकडी फळी इत्यादी ठेवण्यात आले आहे.

यासह छोट्या पिंजऱ्यात प्राण्यांना बसण्यासाठी लाकडी टेबल ठेवण्यात आलेले आहेत. बिबट्या, वाघ, अस्वल, यासह पक्षांच्या पिंजऱ्यात हिटरची सुद्धा व्यवस्था करण्यात आली आहे.