Nagpur News : ‘नागपूरला येतोय हॉटेलमध्ये दोन सुट बुक कर’; राहुल गांधीचा पीए सांगून राष्ट्रीय प्रवक्त्याच्या फसवणुकीचा प्रयत्न

लोकसभेचे विरोधीपक्ष नेता राहुल गांधी यांचा स्वीय सहाय्यक बोलत असल्याचे सांगून काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे यांना ‘मी नागपुरात येतोय हॉटेल रेडिसन ब्ल्यु येथे दोन प्रीमियम सुट बुक कर’ अशी बतावणी केली.
crime

crime

ESakal

Updated on: 

नागपूर - लोकसभेचे विरोधीपक्ष नेता राहुल गांधी यांचा स्वीय सहाय्यक बोलत असल्याचे सांगून काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अतुल लोंढे यांना ‘मी नागपुरात येतोय हॉटेल रेडिसन ब्ल्यु येथे दोन प्रीमियम सुट बुक कर’ अशी बतावणी करीत, त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न एका ठकबाजाने केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी लोंढे यांनी केलेल्या तक्रारीवरून ठकबाजाविरोधात नंदनवन पोलिसांनी फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Loading content, please wait...