Good News : वर्धेत रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात

Good News : वर्धेत रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात

नागपूर : वर्धा येथील जेनेटिक लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडद्वारे कोविड उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या (Remedivir injection) उत्पादनाला गुरुवारपासून सुरुवात झाली. रविवारपासून इंजेक्शन विदर्भातील जिल्ह्यांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि केंद्रीय सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प सुरू झाला आहे. त्यांनी आज वर्धा येथे या प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी वर्धाचे खासदार रामदास तडस (MP Ramdas Tadas), जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, कंपनीचे संचालक वीरेंद्र क्षीरसागर उपस्थित होते. (Commencement of production of Remedesivir Injection in Wardha)

हैदराबाद स्थित हेटरो कंपनीने सदर इंजेक्शन निर्मितीसाठी असणारी परवानगी ही वर्ध्याच्या जेनेटिक लाइफ सायन्सला दिली असून यामध्ये केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया, राज्याचा अन्न व औषध प्रशासन विभाग यांचे सहकार्य मिळाल्याचे गडकरी यांनी सांगितले. अशी परवानगी मिळणारी ही देशातील पहिलीच कंपनी आहे.

Good News : वर्धेत रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या उत्पादनाला सुरुवात
सतत मोबाईलच्या नादात न राहता चिमुकलींन जपला छंद; दगडातून साकारल्या सुंदर कलाकृती 

या लाइफ सायन्स कंपनीचे संचालक वीरेंद्र क्षीरसागर यांनी कमी वेळात आवश्यक असणारी सामग्री तसेच इतर यंत्रणा विकसित केली. कंपनीद्वारे दर दिवसाला ३० हजार इंजेक्शन निर्मितीची क्षमता विकसित करण्यात येणार असून सर्व चाचणी यशस्वी झाल्यानंतर आजपासून इंजेक्शन उत्पादन सुरू झाले आहे. रेमेडसवीर इंजेक्शनचे एक लाख व्हायल्स रविवारपर्यंत उपलब्ध होणार आहेत.

१० वेंटिलेटर

सेवाग्राम येथील रुग्णालयाला तसेच सावंगी मेघे येथील विनोबा भावे रुग्णालयाला प्रत्येकी १० वेंटिलेटर देण्यात आले आहेत. वर्ध्यातील ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी सेवाग्राम येथे २० टन तर विनोबा भावे रुग्णालय येथे २० टन ऑक्सिजन संग्रहाची क्षमता निर्माण करण्यात आली आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.

(Commencement of production of Remedesivir Injection in Wardha)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com