esakal | अखेर नागपूर महापालिकेला सुचलं शहाणपण! खाजगी रुग्णालय बिलासंदर्भात समिती स्थापन
sakal

बोलून बातमी शोधा

अखेर नागपूर महापालिकेला सुचलं शहाणपण! खाजगी रुग्णालय बिलासंदर्भात समिती स्थापन

अखेर नागपूर महापालिकेला सुचलं शहाणपण! खाजगी रुग्णालय बिलासंदर्भात समिती स्थापन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः शहरात गेल्या १४ महिन्यांत ३ लाख २६ हजार बाधित (Coronavirus) आढळून आले. यातील एक लाखांपर्यंत बाधितांनी खाजगी रुग्णालयांत उपचार घेतले. या बाधितांची मोठ्या प्रमाणात लूट झाल्यानंतर महापालिकेला खाजगी रुग्णालयांतील देयकांबाबत (Private hospital bills) तक्रारींच्या निराकरणासाठी समिती गठित करण्याचे सुचल्याचे दिसून येत आहे. कोरोना रुग्णांवर उपचारानंतर शासकीय दराच्या तुलनेत जास्त रक्कम उकळल्याबाबत तक्रार झाल्यानंतर समिती तीन दिवसांत प्रकरण निकाली काढणार आहे. (Committee for inspection of private hospital bills in Nagpur)

हेही वाचा: काय सांगता! दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव गाठणार आतापर्यंतचा उच्चांक?

शहरातील लोकप्रतिनिधी, रुग्ण किंवा रुग्णांच्या नातेवाइकांनी महापौर दयाशंकर तिवारी यांच्याकडे सातत्याने खाजगी रुग्णालयांच्या देयकांबाबत तक्रारी केल्या. एवढेच नव्हेतर महापालिका प्रशासनाकडेही तक्रारींचा ढीग लागला. यातील काही प्रकरणे निकालीही काढण्यात आले. परंतु यासाठी सातत्याने नागरिकांना तगादा लावावा लागला होता. परंतु अनेक तक्रारी आताही प्रलंबित आहेत.

आता खाजगी रुग्णालयांच्या देयकाबाबत तीन दिवसांत निकाल लावला जाणार आहे. याबाबत मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज, मंगळवारी आदेश काढले. बिलासंदर्भात महानगरपालिकेतर्फे तज्ज्ञांची एक विशेष समिती गठित केली.

यात मेडिकलचे निवृत्त अधिष्ठाता डॉ. अभिमन्यू निसवाडे, विषाणूरोग तज्ज्ञ डॉ. मिलिंद भुरसुंडी, भूलतज्ज्ञ डॉ. शेलगावकर, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षा मेश्राम, महालेखाकार कार्यालयातील सहायक लेखाधिकारी संजय वेनोरकर, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयातील सहायक लेखाधिकारी संजय मटलानी, लेखा व कोषागार कार्यालयातील सहायक लेखाधिकारी प्रशांत गावंडे, मनपा उपायुक्त निर्भय जैन, सहायक आयुक्त महेश धामेचा यांचा समावेश आहे. तक्रारीनंतर तीन दिवसांत ही समिती देयकासंबंधी अहवाल अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांच्याकडे सादर करणार आहे. समिती ७२ तासांत तक्रारीचे निराकरण करेल, अशी अपेक्षा समितीकडून असल्याचे महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले.

हेही वाचा: नशा करणाऱ्या तरुणांनो सावधान! नागपुरात ‘ड्रग्स फ्री सीटी’ संकल्पना

नागरिकांना झालेल्या त्रासाबाबत वेगवेगळ्या माध्यमातून तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींचे समिती निराकरण करणार आहे. कोरोना उपचारात खासगी रुग्णालयाकडून अन्याय झालेल्यांनी समितीकडे तक्रार करावी. नागरिकांच्या शंकेचे नि:पक्षपणे निराकरण केले जाईल. यादृष्टीने समिती कार्य करेल.
-दयाशंकर तिवारी, महापौर.

(Committee for inspection of private hospital bills in Nagpur)

loading image
go to top