काय सांगता! दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव गाठणार आतापर्यंतचा उच्चांक? चांदीही महागणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काय सांगता! दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव गाठणार आतापर्यंतचा उच्चांक?

काय सांगता! दिवाळीपर्यंत सोन्याचे भाव गाठणार आतापर्यंतचा उच्चांक?

नागपूर ः कोरोना (Coronavirus)आणि त्यामुळे असलेल्या लॉकडानमुळे (Coronalockdown) अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं बंद आहेत. त्यामुळे सर्वच प्रकारच्या व्यापाऱ्यांना याचा प्रचंड मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यात सोने- चांदीचे सराफा व्यापारी (Jewellers shop) दुकान बंद असल्यानं अडचणीत आहेत. मात्र आता दिवाळीपर्यंत (Diwali 2021) सोन्याचा भाव उच्चांक गाठणार अशी शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात आली आहे. (gold rates will increased till diwali 2021)

हेही वाचा: ओलसर वातावरणात फोफावतो म्युकरमायकोसिस; जाणून घ्या कशी घ्यावी काळजी

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेला बाजारपेठ बंद असली तरी ग्राहकांनी ऑनलाइन सोन्याच्या दागिन्यांची खरेदी केली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच टाळेबंदीचे नियम शिथिल होतील. त्यानंतर सणासुदीचा काळ असल्याने सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

दिवाळीपर्यंत दहा ग्रॅम सोन्यासाठी ६५ हजार रुपये मोजावे लागू शकतात. तर चांदीचा दर प्रति किलो ८० हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सोन्याचे भाव सध्या ४९ हजारांवर तर चांदी प्रति किलो ७५ हजारांवर पोहोचली आहे. सणवार आणि लग्नसराईत लोकांचा कल सोनं खरेदीकडे राहिला आहे.

हेही वाचा: कौतुकास्पद कामगिरी! जीवाची जोखीम स्वीकारून 'ते' करताहेत कोरोना रुग्णांची मदत

कोरोना आणि लॉकडाउनमुळे संपूर्ण व्यवसाय ठप्प झाला होता. सरकारने अनलॉक केल्यानंतर दिवाळीपर्यंत सर्व सुरळीत होईल, अशी अपेक्षा सराफा व्यावसायिकांना आहे. त्यामुळे बाजारात ग्राहकांची वर्दळ वाढण्याची शक्यता आहे.
-राजेश रोकडे, संचालक, रोकडे ज्वेलर्स.

(gold rates will increased till diwali 2021)

loading image
go to top