राज्याच्या तुलनेत नागपूरमध्ये कोरोनामुक्तांचा टक्का वाढला

आजपर्यंतच्या राज्य व नागपुरातील आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत...

Compared the state In Nagpur percentage of corona increased
Compared the state In Nagpur percentage of corona increasedsakal
Updated on

नागपूर : राज्यात नव्हेतर स्थानिक पातळीवर लसीकरणातून तयार झालेल्या सामूहिक प्रतिकारशक्तीचा फायदा दिसून येत आहे. यामुळेच तिसऱ्या लाटेमुळे अधिक प्रमाणात हानी झाली नाही. महिना-दीड महिन्यातच ही लाट ओसरत आहे. आजपर्यंतच्या राज्य व नागपुरातील आढळलेल्या कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण बघता राज्यात ९७.८९ टक्के तर नागपुरात ९७.९४ टक्के व्यक्तीनी कोरोनावर मात केली. दिवसभरात नागपुरात एकही कोरोनाबाधिताचा मृत्यू नाही, तर केवळ १४० नवीन कोरोनाबाधितांची भर पडली. ४०५ बाधितांनी कोरोनावर मात केली.

राज्यात आज १९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत ७८ लाख ५६ हजार ९९४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर यापैकी ७६ लाख ९१ हजार ६४ बाधितांनी कोरोनावर सहज विजय मिळवला. कोरोरोनामुक्तांचे हे प्रमाण ९७.८९ टक्के आहे. तर नागपुरात शनिवारी (ता.१९) ४०५ कोरोनामुक्त झाले. यात २२६ शहरातील आहेत. तर ग्रामीण भागातील १७९ जणांचा समावेश आहे. यामुळे कोरोनामुक्तांचा दर राज्यापेक्षा जास्त म्हणजे ९७.९४ वर पोहचला आहे. नागपूर जिल्ह्यात ५ लाख ७७ हजार ९६ जण आतापर्यंत कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. तर यापैकी ५ लाख ६५ हजार १५६ बाधितांनी कोरोनावर मात केली. महिनाभरात शहरात आजपर्यंत ३ लाख ९९ हजार २३१, ग्रामीणला १ लाख ६७ हजार ९०५, जिल्ह्याबाहेरील ९ हजार ८८० असे एकूण जिल्ह्यात ५ लाख ७७ हजार १६ रुग्ण आढळले. त्यामुळे आजपर्यंतच्या जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या तुलनेत कोरोनामुक्तांचे प्रमाण राज्याच्या तुलनेत कमी म्हणजे ९७.९४ टक्के आहे.

जिल्ह्यात अवघे १५३० सक्रिय कोरोनाबाधित

नागपूरच्या शहरी भागात ९९९, ग्रामीणला ५६५, जिल्ह्याबाहेरील ५ असे एकूण जिल्ह्यात १ हजार ५३० सक्रिय कोरोनाबाधित उपचार घेत आहेत. यातील ५१७ कोरोनाबाधित रुग्णालयात उपचार घेत आहेत. तर गृहविलगीकरणात १ हजार १३ कोरोनाबाधित आहेत.

''लसीकरणाला वेग दिल्याने परिस्थिती निवळत गेली. तसेच जिनोमिक सिक्वेन्सिंग सर्वेक्षण केल्याने विषाणूतील बदलांचे सतत निरीक्षण होत आहे. त्यात सावधगिरी, कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन काही दिवस करणे आवश्यक आहे. काही देशांत कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी बोलले जात आहे. आपल्याकडे लसीकरण उपक्रमातून सामूहिक प्रतिकारशक्तीचा फायदा दिसून येत आहे.''

-डॉ. अविनाश गावंडे, सहयोगी प्राध्यापक, मेडिकल, नागपूर.

कोरोनामुक्ताचे प्रमाण

  • राज्य - ९७.८९ टक्के

  • नागपूर - ९७.९४ टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com