‘भाजपने पराभवाच्या भीतीने मतदारांना लपवून ठेवले’

स्थानिक नगरसेवक व जनता महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत
nana patole
nana patolesakal media

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचा घोडेबाजार सुरू आहे. मात्र, आम्ही ही लढाई विचाराने जिंकणार असल्याचा दावा काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केला. यावेळी त्यांनी बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य देश विकणाऱ्यांच्या म्हणजेच भाजपच्या बाजूने असल्याची टीकाही केली.

विधान परिषदेच्या निवडणुकीत (Nagpur Election) काँग्रेसने रवींद्र भोयर यांना उमेदवारी दिली आहे. ते मूळचे भाजप आणि संघाचे स्वयंसेवक आहेत. त्यांच्या विरोधात भाजपने माजी ऊर्जामंत्री पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी दिली आहे. भाजपने आपल्या मतदारांना सुरक्षित ठिकाणी रवाना केले आहेत. काँग्रेसच्या नियोजनाबाबत विचारणा केली असता पटोले यांनी पराभवाच्या भीतीने भाजपने मतदारांना लपवून ठेवले असल्याचे सांगितले.

nana patole
कोण कुणाचा हिशेब चुकता करणार? अफवांच्या बाजाराने संशयकल्लोळ

भाजपने निवडणूक जिंकण्यासाठी घोडेबाजार सुरू केला आहे. मात्र, स्थानिक नगरसेवक व जनता महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. त्यामुळे आम्हाला मतदारांना कुठेही घेऊन जायची गरज नाही. ही लढाई काँग्रेस विचारानेच जिंकणार असल्याचा दावा पटोले यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची मुंबईत ममता बॅनर्जी यांनी घेतलेली भेट, केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी अस्तित्वात नसल्याचे ममता बॅनर्जी यांनी केलेल्या वक्तव्यावरसुद्धा पटोले यांनी नाराजी व्यक्त केली.

nana patole
MPSC स्पर्धा परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; कोणत्या दिवशी होणार पेपर वाचा...

ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य देश विकाणाऱ्यांची साथ देणारे असेच आहे. सामनाच्या अग्रलेखातून ममता बॅनर्जी यांच्यावर केलेली टीका योग्य असल्याचेही नाना पटोले म्हणाले. काँग्रेसमध्ये अंतर्गत फेरबदल हायकमांडच्या हातात असते. विधानसभेचा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचाच राहणार आहे आणि याच हिवाळी अधिवेशनात निवड होईल असेही पटोले यांनी ठामपणे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com